29 Aug 2010

बायोडाटा..!!

बायोडाटा..!!


जीवाचा
आटापिटा
हाच त्यांचा
बायोडाटा  .....॥१॥


चोचीत मिळण्या
तृणवत काडी
फ़िरवित पंख
रान पछाडी  .....॥२॥

तृणकाड्यांची
गुंफ़ण करुनी
खोपा विणला
लक्ष धरुनी  .....॥३॥


कोणती विद्या?
गुरू कोणता?
घरटे बांधणे
शिकवीत होता  .....॥४॥


कसे उडावे 
किती उडावे 
कसे उमजले 
कोणा ठावे  .....॥५॥  


करुनी फ़डफ़ड 
प्रयास करणे 
हव्यास धरणे 
निरंतर धरणे .....॥६॥  


गवसून घेतो 
स्वयेच वाटा 
तोच त्यांचा 
बायोडाटा  .....॥७॥ 


              गंगाधर मुटे
............ **..........

4 comments:

  1. विजय शेंडगे15 June 2010 at 8:54 pm

    कविता मनापासून आवडली

    ReplyDelete
  2. कविता आवडली.अगदी अगदी मनापासून !!

    ReplyDelete
  3. धन्यवाद मित्रांनो.
    आभारी आहे.

    ReplyDelete